12वी मध्ये कमी गुण मिळालेत? तुमच्यासाठी सर्वोत्तम करिअर पर्याय | 12वीत कमी गुण मिळाले तरीही यशस्वी करिअर संधी

12वी निकालात कमी गुण मिळालेत? चिंता नको – तुमच्यासाठी करिअरचे अनेक पर्याय खुले आहेत!

निराश होण्याचं कारण नाही. गुण हे यशाचं एकमेव मापदंड नाहीत. तुमच्यातील कौशल्य, मेहनत आणि योग्य दिशा हेच यशाचे खरे आधार आहेत. कमी गुण मिळाल्यानंतरही अनेक करिअर आणि कोर्सेसचे पर्याय तुमच्यासमोर खुले आहेत.

12वी कमी गुण मिळाल्यानंतर उपलब्ध असलेले करिअर पर्याय

 

1.स्किल-बेस्ड आणि डिप्लोमा कोर्सेस

प्रमुख कोर्सेस:हे कोर्स कमी कालावधीचे असून, विशिष्ट कौशल्य शिकवतात. नोकरीसाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त.

  • डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा
  • ग्राफिक डिझाईन / अ‍ॅनिमेशन
  • फोटोग्राफी / व्हिडिओग्राफी
  • वेब डेव्हलपमेंट
  • फॅशन डिझायनिंग
  • इव्हेंट मॅनेजमेंट
  • हॉटेल मॅनेजमेंट

2. ITI कोर्सेस (Industrial Training Institute)

लोकप्रिय ITI कोर्सेस: व्यावसायिक प्रशिक्षण देणारे हे कोर्स उद्योगांमध्ये त्वरित नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर आहेत.

  • वेल्डर
  • इलेक्ट्रिशियन
  • फिटर
  • मशीनिस्ट
  • मोटर मेकॅनिक

3. स्पर्धा परीक्षा – कमी गुण असूनही तुम्ही सरकारी व खाजगी नोकऱ्यांसाठी परीक्षा देऊ शकता.

  • SSC CHSL
  • रेल्वे ग्रुप D
  • पोलीस भरती
  • बँकिंग क्लार्क परीक्षा
  • MPSC लघु सेवा परीक्षा

 

ओपन युनिव्हर्सिटी आणि डिस्टन्स लर्निंग

ज्यांना अजून शिकायचं आहे किंवा पार्ट टाइम शिक्षण घेऊन डिग्री पूर्ण करायची आहे अशासाठी ओपन युनिव्हर्सिटी हा एक चांगला ऑपशन आहे . तुम्ही इथे जॉब करत करत आपले शिक्षण सुद्धा पूर्ण करू शकता . जर नियमित कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नसेल, तर ओपन युनिव्हर्सिटी एक उत्तम पर्याय आहे.

प्रमुख ओपन युनिव्हर्सिटीज:

  • IGNOU  (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय)
  • YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)

डिग्री कोर्सेस:

  • BA, BCom, BCA, BSc
  • IT, Education, Journalism, Management

 

ऑनलाईन कोर्सेस आणि सर्टिफिकेशन

आजच्या डिजिटल युगात घरी बसून स्किल शिकणे अत्यंत सोपं आहे.

प्लॅटफॉर्म्स:

  • Coursera – जगभरातील प्रसिद्ध युनिव्हर्सिटीजचे कोर्सेस उपलब्ध. काही कोर्सेस मोफत, सर्टिफिकेटसाठी फी लागते.
  • Udemy – स्वतःच्या वेळेनुसार शिकण्यासाठी उत्कृष्ट. दररोज विविध कोर्सेसवर सवलती.
  • edX –   Harvard, MIT सारख्या संस्थांचे कोर्सेस. प्रमाणपत्र घेण्यासाठी काही फी लागते.
  • Google Skillshop – Google चे अधिकृत कोर्सेस – Google Ads, Analytics, YouTube Certification इत्यादीसाठी.
  • Skill India– ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. येथे विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, ऑनलाईन कोर्सेस आणि करिअर मार्गदर्शन उपलब्ध आहे.

लोकप्रिय कोर्सेस:

  • डिजिटल मार्केटिंग
  • कोडिंग (Python, JavaScript)
  • व्हिडिओ एडिटिंग
  • सोशल मीडिया मॅनेजमेंट

 एन्ट्री-लेव्हल जॉब्ससाठी तयारी

कमी शैक्षणिक पात्रतेसह नोकरी देणाऱ्या क्षेत्रांमध्ये सुरुवात करा.

  • BPO / KPO
  • डेटा एंट्री
  • सेल्स / मार्केटिंग
  • कस्टमर सर्व्हिस

 

टेक्निकल रिपेअरिंग कोर्सेस – कमी गुंतवणुकीत भरपूर कमाई

आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे या उपकरणांच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञांची गरज सतत वाढत आहे.

अशा वेळी मोबाईल रिपेअरिंग, लॅपटॉप रिपेअरिंग, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिपेअरिंग कोर्सेस हे कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे आणि भरपूर कमाई देणारे कोर्सेस ठरू शकतात. आजच्या काळात मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पुटर सर्वत्र वापरले जातात. त्यामुळे त्यांची दुरुस्ती शिकणं फायदेशीर ठरू शकतं.

हे कोर्सेस का करावेत?

  • कमी वेळात कौशल्य: 3-6 महिन्यांत प्रशिक्षित टेक्निशियन बना
  • स्वतःचा व्यवसाय: छोट्या दुकानातून सुरुवात करा
  • चांगला पगार: अनुभव वाढवल्यानंतर स्वतःचं सर्व्हिस सेंटर
  • शैक्षणिक अट कमी: फक्त 12वी पास पुरेसं
  • सर्वत्र संधी: शहर किंवा गाव, सर्वत्र रिपेअरिंगची गरज

प्रमुख टेक्निकल कोर्सेस

  • Mobile Repairing Course – मोबाईल दुरुस्ती कोर्स
  • Laptop Repairing Course- लॅपटॉप दुरुस्ती कोर्स
  • Chip Level Repairing Course – चिप लेव्हल दुरुस्ती कोर्स
  • EMMC Programming Course –  ईएमएमसी प्रोग्रॅमिंग कोर्स
  • Computer Hardware & Networking –  संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्स
  • CCTV Installation & Repairing –  सीसीटीव्ही बसवणी व दुरुस्ती कोर्स

संदेश: कमी गुणांमुळे निराश होण्याऐवजी, नव्या संधींचा विचार करा आणि तुमच्या हातातली कौशल्ये वाढवा! गुण कमी असले तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता. योग्य स्किल, मेहनत, आत्मविश्वास आणि दिशा असली की यश लांब नसतं. कोणताही गुण तुमची किंमत ठरवत नाही – तुमची मेहनत आणि जिद्द ठरवते.


 [FAQ – तुमचे प्रश्न ]

प्रश्न 1: CBSE बारावीत 50% पेक्षा कमी गुण पडले, तरी मी काय करू शकतो?
उत्तर: होय, तुम्ही ITI, डिप्लोमा, स्किल कोर्सेस, ओपन युनिव्हर्सिटीतून डिग्री करू शकता आणि नोकरी मिळवू शकता.

प्रश्न 2: ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे काय?
उत्तर: जिथे तुम्हाला नियमित कॉलेजला जायची गरज नाही, घरबसल्या शिक्षण घेता येतं. IGNOU, YCMOU ही प्रमुख उदाहरणं आहेत.

प्रश्न 3: कोणते ऑनलाईन कोर्स फायदेशीर आहेत?
उत्तर: डिजिटल मार्केटिंग, कोडिंग, ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया मॅनेजमेंट हे कोर्सेस करिअरसाठी फायदेशीर आहेत.

गुण हे शेवट नाहीत, सुरुवातीचा टप्पा आहेत.
कमी गुणांमुळे निराश न होता, नवे पर्याय शोधा, स्किल मिळवा आणि आत्मविश्वास ठेवा – यश तुमच्या पावलांखाली झुकलंच पाहिजे!

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? तर जरूर शेअर करा आणि अशाच उपयोगी लेखांसाठी आमचं पेज फॉलो करा!

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स