पुण्यात ‘बॅन टर्की’ मोहिम जोरात सुरु-तुर्की सफरचंदावर बहिष्कार

पुणे, १३ मे २०२५:
भारत ने पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते , या बातमी नंतर जगभरातून भारताला सपोर्ट मिळाला , पण याच दरम्यान असा एक देश होता जो पाकिस्तानला सपोर्ट करत आहे आणी त्याच नाव आहे “तुर्की” .

पुण्यातील व्यापाऱ्यांचा तुर्की सफरचंदावर बहिष्कार

पाकिस्तान भारता विरोधात अतांगवादी कारवाया करत असताना अशा देशाला सपोर्ट करणे हे लाजिरवाणे आहे.  तुर्कीने भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा  दिल्यामुळे देशभरात ‘बॅन टर्की‘ मोहिमेने जोर धरला आहे. या मोहिमेचा प्रभाव पुणे शहरातही दिसून येतो आहे.

पुण्यातील फळ व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून येणाऱ्या सफरचंदांवर पूर्णतः बहिष्कार टाकला असून, शहरातील बाजारपेठांमधून तुर्की सफरचंद पूर्णपणे गायब झाले आहेत. तुर्कीच्या ऐवजी इतर देशांमधून किंवा भारतातील हिमाचल व उत्तराखंडमधून आलेले सफरचंद खरेदी केली जात आहेत. देशभरातून फक्त सफरचंदच नव्हे तर इतर तुर्की उत्पादनेही बहिष्कृत करण्याचा सूर जोर धरत आहे.

 

🍎 तुर्की सफरचंद का प्रसिद्ध आहेत?

उत्कृष्ट दर्जा व चमकदार रंग: तुर्की सफरचंदांचे रंग (विशेषतः लाल आणि गुलाबी छटांचे) अत्यंत आकर्षक असतात. त्यांच्यात एकसंधता, वजन आणि चमक असते जी ग्राहकांना आकर्षित करते.

जास्त शेल्फ-लाइफ (Shelf Life): तुर्की सफरचंदांची टिकाऊ क्षमता अधिक असते. त्यामुळे ते दीर्घकाळ साठवता येतात आणि आयात केलेल्या बाजारांसाठी उपयुक्त ठरतात.

गोडसर आणि कुरकुरीत चव: त्यांची चव सौम्य गोडसर व कुरकुरीत असल्यामुळे भारतीय ग्राहकांमध्ये विशेष पसंती मिळते.

अच्छा आकार आणि सादरीकरण: तुर्की सफरचंदांचा आकार नियमित आणि मोठा असतो. साजेसं पॅकेजिंग व गुणवत्ता यामुळे हे सफरचंद अनेकदा हॉटेल, मॉल, आणि गिफ्टिंगसाठी वापरले जातात.

स्पर्धात्मक किंमत: भारतासारख्या देशात तुर्की सफरचंद हे स्थानिक सफरचंदांपेक्षा कधी कधी स्वस्त किंवा तुलनात्मक किंमतीत मिळत असल्याने व्यापाऱ्यांकडून ते मोठ्या प्रमाणावर मागवले जात होते.

पण ह्यावेळेस ‘बॅन टर्की’ मोहिम जोरात सुरु

तुर्कीच्या पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यानंतर देशभरात ‘बॅन टर्की‘ मोहिम सुरु झाली असून, पुणे व इतर शहरांमधील व्यापारी वर्गाने यावर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे सध्या त्यांच्या मागणीत तीव्र घट झाली आहे ही भारतीयांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे

या निर्णयामुळे या हंगामात अंदाजे ₹१,००० ते ₹१,२०० कोटींचा आर्थिक फटका बसला असला तरी, देशप्रेमाच्या भावनेपोटी व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे ते सांगतात.

सध्या व्यापारी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इराण येथून सफरचंदाची आयात करत आहेत. ग्राहकही या मोहिमेला प्रतिसाद देत तुर्कीच्या सफरचंदांऐवजी इतर पर्याय निवडत आहेत.

यामुळे एकंदरीत सफरचंदांची मागणी ५०% नी घटली असून, ग्राहक देशभक्तीचा विचार करत देशी उत्पादकांना प्राधान्य देत आहेत.

पुण्यात “बॅन टर्की” मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे ,या निर्णयामुळे तुर्की सफरचंद पुण्यातील बाजारातून पूर्णपणे गायब झाले आहेत. या मोहिमेचा उद्देश देशभक्ती दर्शविणे आणि भारताच्या सशस्त्र दलांना पाठिंबा देणे हा आहे.  आणी तो यशस्वी होताना दिसत आहे . तुम्ही सुद्धा या मोहिमे मध्ये सहभागी होऊन भारताच्या गौरव वाढवावा अशी आमची इच्छा आहे .

तुर्कीच्या भूमिकेवर देशभरातून टीका होत असून, फक्त सफरचंदच नव्हे तर इतर तुर्की उत्पादनेही बहिष्कृत करण्याचा सूर जोर धरत आहे. हा बहिष्कार केवळ बाजारपेठेपुरता मर्यादित नसून, देशहितासाठी नागरिकांनी दाखवलेली आर्थिक प्रतिकाराची भावना आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक ठरत आहे.

पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांवर बहिष्कार घातल्याबद्दल अधिक माहितीसाठी  व्हिडिओ पाहा:

READ MORE 

  1. PF बॅलन्स चेक करायचाय एक मिस्ड कॉल किंवा SMS पुरेसा आहे!
  2. Samsung Galaxy S25 Edge – जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन!
  3. “श्री स्वामीनारायण मंदिर पुणे – नयनरम्य कोरीव काम पाहून तुम्ही थक्क व्हाल!”

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स