पुण्यातील स्वतःची मालमत्ता असणार्यांसाठी एक खुश खबर, पीएमसी (PMC) कडून असे आवाहन करण्यात आले आहे की , २०१९ नंतर नोंदणीकृत मालमत्ताधारकांनी ४०% मालमत्ता कर सवलतीचा लाभ घ्यावा.
स्वतःच्या घरामध्ये वास्तव्यासाठी असलेल्या मालमत्तांवर पुन्हा लागू करण्यात आलेली ४०% मालमत्ता कर सवलत अद्यापही २०२५–२६ च्या कर बिलांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली नाही. PMC प्रशासनाने नागरिकांना आश्वासन दिले होते की, PT-3 फॉर्म भरलेल्यांना ही सवलत थेट त्यांच्या बिलांमध्ये दर्शवली जाईल
पुणे महानगरपालिका: पुण्यातील मालमत्ताधारकांनी ४०% मालमत्ता कर सवलतीचा लाभ घ्यावा.
पुणे महानगरपालिकेकडून (PMC) नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, २०१९ नंतर ज्यांची घरे नोंदणीकृत झाली आहेत आणि जे अद्यापही ४०% मालमत्ता कर सवलतीचा लाभ घेत नाहीत, त्यांनी त्वरित प्रभागीय कार्यालयात ‘PT-3’ फॉर्म भरून सादर करावा आणि या योजने चा लाभ घ्यावा
परंतु या मध्ये एक महत्वाची अट आहे की ज्यांचे घर भाड्याने दिले आहे अशा मालमत्ताधारकांना हा लाभ घेता येणार नाही
महानगरपालिका सध्या स्वतःच्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना ४०% मालमत्ता कर सवलत देत आहे. मात्र, ही मालमत्ता भाड्याने दिल्यास हा सवलतीचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
२०१९ पूर्वी नोंदणीकृत मालमत्तांना ही सवलत आपोआप लागू झाली होती, मात्र त्यानंतर नोंदणीकृत घरांसाठी मालकांनी स्वतंत्रपणे फॉर्म भरून ही सवलत मिळवणे आवश्यक आहे.
PT-3 फॉर्म कसा डाउनलोड करावा – पुणे PMC
PT-3 फॉर्म डाउनलोड करण्यासाठी
- सर्वप्रथम https://propertytax.punecorporation.org/ या पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत मालमत्ता कर वेबसाइटला भेट द्या.
- पेजच्या तळाशी (bottom) स्क्रोल करा.
- “४०% सवलतीसाठी अर्ज फॉर्म (PT-3)” असा पर्याय दिसेल.
- त्या लिंकवर क्लिक करून PT-3 फॉर्म PDF स्वरूपात डाउनलोड करा.
- फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह आपल्या प्रभाग कार्यालयात सादर करा.
आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी काय सांगितले ?
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले की, “राज्य सरकारने या सवलतीला मान्यता दिल्यामुळे पालिकेकडून नागरिकांना फायदा दिला जात आहे. अनेक नागरिकांनी फॉर्म भरून सवलतीचा लाभ घेतला आहे. मात्र, जीपीएस आणि डोअर-टू-डोअर सर्वेक्षणानंतर असे लक्षात आले की अनेक नागरिकांनी अद्याप फॉर्म भरलेले नाहीत. त्यामुळे सर्वांनी प्रभागीय कार्यालयात ‘PT-3’ फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत.”
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालक स्वतः त्या घरात राहत असल्याचे पुरावे आवश्यक आहेत. त्यामुळे भाड्याने दिलेल्या मालमत्तांना ही सवलत लागू होणार नाही.
फॉर्म आणि माहिती प्रभागीय कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. नागरिकांनी ही संधी न गमावता लवकरात लवकर अर्ज सादर करावा, असे आवाहन PMC तर्फे करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेकडून २०२५-२६ साठी मालमत्ता कर बिलांचे पोस्टाद्वारे वाटप सुरू
पुणे महापालिकेच्या कर विभागाने माहिती दिली आहे की, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर बिलांचे वितरण भारतीय टपाल विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. याशिवाय, नागरिकांना त्यांचे मालमत्ता कर बिल PMC च्या अधिकृत संकेतस्थळावरून देखील डाउनलोड करता येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने मालमत्ता करावर आगाऊ भरणाऱ्यांसाठी सवलतीची योजना सुरू ठेवली आहे. ३१ मेच्या आत कर भरणाऱ्या नागरिकांना १०% किंवा ५% इतकी सवलत मिळणार आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून या सवलतीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
भाजप नेते उज्वल केसकर यांनी व्यक्त केली नाराजी
भाजपचे नेते उज्वल केसकर यांनी सांगितले की, “राज्य सरकारचा निर्णय खूप साधा आणि सरळ होता – स्वतःच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना ४०% मालमत्ता कर सवलत द्यायची होती. पण प्रशासनाने ही प्रक्रिया अनावश्यकपणे गुंतागुंतीची केली आहे. नागरिकांना वेगवेगळे फॉर्म भरायला लावून वेळ वाया घालवला जात आहे.**
त्यांच्या मते, “ही सवलत सर्वांना सरसकट देण्यात यायला हवी होती, पण सरकारचा भर कर वसुलीवर अधिक आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याऐवजी अडथळे निर्माण केले जात आहेत.“
पुणे महानगरपालिके कडून मिळकतकरात सवलत मिळण्यासाठी कोणत्या योजना आहेत?
1.एकरकमी कर भरणा सवलत (1 एप्रिल ते 31 मे पर्यंत):
- ₹25,000 पेक्षा कमी सर्वसाधारण कर: 10% सवलत
- ₹25,001 पेक्षा जास्त सर्वसाधारण कर: 5% सवलत
2.स्वातंत्र्य सैनिक सवलत:
- हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या एका निवासी मिळकतीवर 100% सामान्य कर माफ
3.पर्यावरणपूरक उपाययोजनांवर सवलत:
- तीन पैकी दोन उपाय (सौरऊर्जा, पावसाचे पाणी पुनर्वापर, गांडूळखत प्रकल्प) केल्यास:
चालू करात 10% सवलत (पाणीपट्टी व शासन कर वगळून) - तीन पैकी एक उपाय केल्यास:
चालू करात 5% सवलत (पाणीपट्टी व शासन कर वगळून)
READ MORE
- PF बॅलन्स चेक करायचाय एक मिस्ड कॉल किंवा SMS पुरेसा आहे!
- महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ ला अदानी ग्रुपचा टायटल स्पॉन्सरशिप
- पुणेकर आणी पुण्यात आलेले पाहुणे याना या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शांतता, भक्ती आणि अद्वितीय शिल्पकलेचा संगम अनुभवायचा असेल, तर BAPS श्री स्वामीनारायण मंदिर, नर्हे आंबेगाव हे एक परिपूर्ण ठिकाण आहे.