“दहावी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडाल? इथे आहे संपूर्ण मार्गदर्शक!”

दहावी नंतर काय करावे?

हा प्रश्न विद्यार्थी आणि पालक दोघांसाठी महत्वाचा असतो , बऱ्याच लोकांकडून सल्ले घेतले जातात पण सल्ला नेहमी जाणकार माणसाकडून घेणे आवश्यक असते.

दहावी नंतर विद्यार्थींसाठी अनेक करिअर मार्ग उपलब्ध असतात. ते कोणतेही क्षेत्र निवडू शकतात, आणि यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. खाली दहावी नंतरच्या विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे.

पहिला पर्याय अकरावी-बारावी – तीन मुख्य शाखा

 

अकरावी-बारावी सायन्स (Science)

सायन्स शाखेत प्रवेश घेतल्यावर, विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर, फार्मसी, रिसर्च व इतर तांत्रिक क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते. या क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढे मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये पदवी शिक्षण घ्यावं.

विषय: फिजिक्स (Physics) ,केमिस्ट्री (Chemistry) , बायोलॉजी (Biology) ,मॅथ्स (Mathematics) , IT (Information Technology) , इलेक्ट्रॉनिक्स

 

बायोलॉजी या विषया च्या जागी तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स किंवा भूगोल हा विषय घेऊ शकता , ज्यांना मेडिकल साठी जायचे नाही त्यांच्या साठी हा पर्याय बऱ्याच कॉलेज मध्ये उपलब्ध असतो

करिअर पर्याय:

एमबीबीएस / बीडीएस (MBBS/BDS – डॉक्टर/दातांचा तज्ञ) , इंजिनिअरिंग (B.Tech/B.E.) , फार्मसी (Pharmacy) , फिजिक्स / केमिस्ट्री / बायोलॉजी रिसर्च (Research in Physics, Chemistry, Biology)

 

 

अकरावी-बारावी कॉमर्स (Commerce)

कॉमर्स शाखेत प्रवेश घेतल्यावर, विद्यार्थी बिझनेस, फायनान्शिअल सेक्टर, बँकिंग, अकाउंटिंग, शेअर मार्केट आणि इतर फाइनान्शिअल क्षेत्रांमध्ये करिअर करू शकतात. या क्षेत्रातील अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होतात.

विषय: बिझनेस स्टडीज (Business Studies) ,अकाउंटिंग (Accounting) ,इकोनॉमिक्स (Economics)

करिअर पर्याय:

B.Com (वाणिज्य पदवी) ,CA (चार्टर्ड अकाउंटंट) , CS (कंपनी सेक्रेटरी) , CMA (कोस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट) , MBA (मास्टर्स इन बिझनेस अडमिनिस्ट्रेशन) बँकिंग, फायनान्शिअल मॅनेजमेंट, शेअर मार्केट इत्यादी

 

अकरावी-बारावी आर्ट्स (Arts)

आर्ट्स शाखेतील विद्यार्थी समाजशास्त्र, मानसशास्त्र, पत्रकारिता, UPSC/MPSC तयारी करणारे, साहित्य व इतर कलांचे क्षेत्र निवडू शकतात. यामध्ये साहित्य, समाजशास्त्र, इतिहास, आणि राजकारण यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं.

विषय: पॉलिटिकल सायन्स (Political Science) ,हिस्ट्री (History) ,जिओग्राफी (Geography) ,मराठी / इंग्रजी साहित्य (Marathi/English Literature)

करिअर पर्याय:

  • BA (Bachelor of Arts)
  • BJMC (बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मॅस कम्युनिकेशन)
  • UPSC/MPSC (राज्य व केंद्र सरकारी सेवा)
  • मीडिया आणि पत्रकारिता (Journalism & Mass Communication)
  • मानसशास्त्र, समाजशास्त्र (Psychology, Sociology)

 

ITI (Industrial Training Institute)

टेक्निकल स्किल्स शिकण्यासाठी.

ITI मध्ये विविध तांत्रिक कोर्सेस आहेत जे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पूर्ण करून लवकर रोजगार मिळवण्यासाठी मदत करतात. या कोर्सेसमध्ये विविध प्रकारच्या कामांची शिकवण दिली जाते.

उपलब्ध कोर्सेस:

  • इलेक्ट्रिशियन (Electrician)
  • फिटर (Fitter)
  • वेल्डर (Welder)
  • मेकॅनिक (Mechanic)
  • प्लंबर (Plumber)
  • ऑटोमोबाइल (Automobile)

लवकर रोजगाराची संधी:

  • सरकारी व खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवता येऊ शकते.
  • इ.आय.टी.आय. कोर्सेस प्रमाणपत्र आधारावर काम करण्याची संधी.

 

 पॉलीटेक्निक (Diploma in Engineering)

इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल पण 12वी सायन्स न करता इंजिनिअर व्हायचं असेल, तर पॉलीटेक्निक एक चांगला पर्याय आहे.

शाखा:  मेकॅनिकल (Mechanical) , सिव्हिल (Civil) , इलेक्ट्रिकल (Electrical) , कम्प्युटर (Computer)

करिअर पर्याय:

  • B.Tech/B.E. मध्ये प्रवेश (पॉलीटेक्निक पूर्ण केल्यावर इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश)
  • नोकरीच्या संधी – खासगी कंपन्यांमध्ये तसेच सरकारी क्षेत्रात इंजिनिअरिंगच्या विविध पदांवर काम करण्याची संधी.

 

नॉन-टेक्निकल डिप्लोमा कोर्सेस 

पॉलीटेक्निक प्रमाणेच, नॉन-टेक्निकल डिप्लोमा कोर्सेस देखील विद्यार्थ्यांसाठी एक चांगला मार्ग आहेत.

उपलब्ध कोर्सेस:

  • फॅशन डिझाईनिंग (Fashion Designing)
  • फोटोग्राफी (Photography)
  • हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management)
  • अॅनिमेशन (Animation)
  • ग्राफिक डिझाईन (Graphic Design)
  • डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)

करिअर पर्याय:

  • संबंधित क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी.
  • स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी.

याप्रमाणे, दहावी आणि बारावी नंतर अनेक शक्यतांच्या दरवाजे उघडतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करिअर निवडू शकता. योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रम निवडून तुम्ही उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करू शकता.

 

दहावी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडायचा? – योग्य निर्णयासाठी ४ स्मार्ट स्टेप्स

दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालक या विचारात असतात की, पुढे कोणता अभ्यासक्रम निवडायचा? हा निर्णय तुमच्या भविष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतो, म्हणूनच हे निर्णय हुशारीने घेणे आवश्यक आहे.

स्वतःला ओळखा – स्व-मूल्यांकन करा
तुम्हाला काय आवडतं? कोणत्या विषयांमध्ये रस आहे? तुमची ताकद कोणत्या क्षेत्रात आहे आणि कुठे तुम्हाला अजून मेहनत घालावी लागेल – हे समजून घ्या. उदाहरणार्थ, जर गणित आणि आकडेमोड चांगली जमते, तर कॉमर्स किंवा सायन्सचा विचार करू शकता. जर समाजशास्त्र, इतिहास किंवा भाषांमध्ये आवड असेल, तर आर्ट्स हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

करिअर संधींचा अभ्यास करा – फक्त कोर्स नव्हे, तर भविष्यातील नोकऱ्यांवर लक्ष ठेवा
तुमच्या आवडत्या विषयाशी संबंधित क्षेत्रांमध्ये काय करिअर संधी आहेत, हे शोधा. कोणत्या क्षेत्रात वाढीची संधी जास्त आहे? कोणत्या कौशल्यांची मागणी आहे? उदाहरणार्थ, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, डाटा सायन्स, हेल्थकेअर, फायनान्स – ही क्षेत्रे सध्या आणि भविष्यातही महत्त्वाची ठरणार आहेत.

भविष्यातील ट्रेंड्सवर नजर ठेवा – फक्त आज नाही, उद्याचाही विचार करा
जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, पर्यावरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या क्षेत्रांची मागणी भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे अशा क्षेत्रांमध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत का, याकडे लक्ष द्या.

मार्गदर्शन घ्या – अनुभवी लोकांचे ऐका
शिक्षक, करिअर काउंसिलर, वडीलधारी व्यक्ती किंवा ज्यांनी त्या क्षेत्रात काम केलं आहे अशा लोकांशी चर्चा करा. त्यांचा अनुभव, सल्ला आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी अमूल्य ठरू शकतो. कधी कधी एका छोट्याशा सल्ल्यामुळे संपूर्ण दिशा स्पष्ट होते.

 

प्रा. विजय नवले सर – करिअर मार्गदर्शन आणि प्रेरणादायी सत्रांसाठी एक विश्वासार्ह नाव

प्रा. विजय नवले सर हे भारतातील एक नामवंत करिअर मार्गदर्शक, प्रेरणादायी वक्ते आणि प्रशिक्षक आहेत. त्यांना २५ वर्षांपेक्षा अधिक काळाचा करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे समुपदेशन व मोटिवेशनल सत्रांचा अनुभव आहे. आजवर त्यांनी ४००० पेक्षा अधिक सत्रांचे आयोजन केले असून, १५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले आहे.

अधिक माहितीसाठी आणि सल्ल्यासाठी भेट द्या:
🌐 www.careerseva.com/FindCareerCounselor

तुमच्या यशस्वी भविष्यासाठी योग्य मार्गदर्शनाची सुरुवात आजच करा!

 

READ MORE

दहावी आणि बारावी नंतर कॉमर्स विभागातील विविध करिअर संधी

महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ ला अदानी ग्रुपचा टायटल स्पॉन्सरशिप 

सॅमसंगचा नवा “Beyond Slim” स्मार्ट फोन का आहे सगळ्यात वेगळा ?

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मुडीत दाणीच्या लग्नात अंबानी कुटुंबाची उपस्थिती मीडियावर चर्चेचा विषय मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी